महिलांनी ‘या’ गोष्टी टाळणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक

महिलांनी ‘या’ गोष्टी टाळणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : फॅशन करताना आपण आरोग्याचा विचार कधीच करत नाही. केवळ बाह्य सौंदर्य कसे दिसेल एवढाच विचार केला जातो. कधी-कधी ही फॅशन आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यानंतर त्रासदायक ठरते. गृहिणी मग ती घरात काम करणारी असो की नोकरी करणारी फॅशन ही त्यांच्या आवडीची असते.

मात्र, ती करताना होणाऱ्या लहानमोठय़ा चुका टाळणे खूप आवश्यक आहे. मोठी हँडबॅग, टाइट जीन्स, जड इयर रिंग यामुळे शरीराचे नुकसान होत असते. यामुळे कोणते नुकसान होते त्याविषयी माहिती घेवूयात. दररोज वापरात असणाऱ्या, पण शरीराला घातक ठरू शकणाऱ्या काही गोष्टी महिलांनी निश्चितपणे टाळल्या पाहिजेत. महिला मोठी हँडबॅग सर्रास वापरतात. या बॅगेत जास्त वस्तू रहात असल्याने महिलांना अशी बॅग आवडते.

एकाच खांद्यावर अशी जड बॅग लावल्यास मान आणि पाठीच्या स्नायूंना दुखापत होते. फॅशन म्हणून मोठी बॅग वापरायची असेल तर त्यामध्ये जास्त वजनदार वस्तू ठेवू नयेत, असे तज्ज्ञ सांगतात. तसेच आणखी एक शरीराला त्रासदायक फॅशन म्हणजे स्कीन टाइट जीन्सची होय. ही फॅशन महिलांमध्ये खूप प्रिय आहे. परंतु खूप वेळ अशी जीन्स परिधान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. फिट्ट जीन्समुळे रक्ताभिसरण प्रणालीवर विपरित परिणाम होतो.

पायात रक्ताच्या गाठी होणे, ब्लॅडर आणि युरिन इन्फेक्शनसारख्या समस्या होतात, असे संशोधनात सिद्ध झाले आहे. आरामदायी आणि थोड्याशा सैल कपड्यांना महिलांनी प्राधान्य दिले पाहिजे. तसेच अनेक मुली फॅशन म्हणून हेवी इअररिंग घालतात. मात्र अशा जड रिंगांमुळे कानाच्या त्वचेवर जादा ताण पडतो. यामुळे कानाची छिद्रे मोठी होतात. जास्त काळ अशा रिंग वापरल्यास त्वचा कापण्याचा धोका असतो. कानाला जखम सुद्धा होऊ शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु