तुमचा विसरभोळेपणा वाढत चालला आहे का? मग करा ‘हे’ उपाय

तुमचा विसरभोळेपणा वाढत चालला आहे का? मग करा ‘हे’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही कारणांमुळे मेंदुची क्षमता कमी झाल्याने विसरभोळेपणाचा त्रास जाणवू लागतो. ही समस्या खुपच घातक आणि त्रासदायक ठरू शकते. ही समस्या होण्यामागील जी कारणे आहेत, त्यामध्ये योग्य आहार हे सर्वात मोठे कारण आहे. यासाठी योग्य आहार घेतल्यास ही समस्या कमी करता येणे शक्य आहे.

आहारात घ्या हे पदार्थ

भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियांचे जास्ती सेवन केल्यामुळे  मानसिक स्वास्थ्यासाठी चांगले असते.

ऑलिव्ह ऑइल
स्वयंपाकासाठी ऑलिव्ह ऑइल वापर करू शकता. तसेच पोळीवर देशी तुपाऐवजी हे तेल वापरु शकता. यामुळे मेंदूला ऊर्जा मिळते.

टोमॅटो
टोमॅटोमधील एंटीऑक्सिडेंटमुळे स्मरणशक्ती चांगली होते. यासाठी दररोजच्या आहारात सॅलडमध्ये टोमॅटोचा समावेश करावा.

मनुके
मनुक्यातील विटामिन-सी मुळे मेंदू ताजातवाना होतो. दररोज सकाळी १५-२० मनुके भिजवून खावेत. यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. शिवाय, ह्रदय निरोगी राहाते.

हे पदार्थ खावू नका
* जास्तीचे मीठ
* साखर
* तळलेले पदार्थ
* फास्ट फूड

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु