वजन खूपच कमी आहे का ? मग ‘हा’ आहार तुमच्यासाठी आहे फायदेशिर

वजन खूपच कमी आहे का ? मग ‘हा’ आहार तुमच्यासाठी आहे फायदेशिर

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खूपच किरकोळ बांधा असल्यास व्यक्तीमत्व उठून दिसत नाही. त्यामुळे अशी देहयष्टी असणारांना वाटते की आपले वजन वाढावे. एकीकडे लठ्ठपणाची समस्या वाटत असताना आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी विविध प्रयत्न अनेक लोक करत असताना वजन वाढविण्यासाठीही काही जण प्रयत्नशिल असतात. अशा लोकांनी आपल्या आहारात काही बदल केले तर त्यांचे वजन वाढू शकते.

अतिशय सडपातळ असणारांना वैद्यकीय भाषेत अँक्टमॉफ्र्स असे म्हटले जाते. अशा व्यक्ती म्हणजे शरीरावरील हाडांच्या सांगाड्यावर फक्त कातडीचा थर असल्यासारख्या वाटतात. सडपातळ लोकांना वजन वाढवणे खूप कठीण जाते. त्यांची चयापचय क्षमता खूप जास्त असल्याने कॅलरी खूप लवकर जळते. अशा व्यक्तींना जास्त कॅलरीची गरज असते. वजन वाढवणे म्हणजे फॅट मिळवणे नाही, हे समजून घेतले पाहिजे. वजन वाढवण्याचा अर्थ स्नायू वाढवणे होय. सडपातळ व्यक्तीने वजन वाढवण्यासाठी आहारात बदल करावा. जेवणामध्ये कॅलरीजचे प्रमाण वाढवावे. कार्बोहायड्रेट्समध्ये कॅलरीज खूप असतात.

वजन खूपच कमी आहे का ? मग ‘हा’ आहार तुमच्यासाठी आहे फायदेशिर

सडपातळ लोकांमध्ये प्रोटिन स्पेयरिंग अँक्शन असल्याने त्यांना कार्बोहायड्रेट्स आवश्यक असतात. यामुळे प्रथिनांना स्नायू बळकट करण्यास मदत मिळते. अशा लोकांनी कार्बोहायड्रेटसह प्रथिनांचे अधिक प्रमाण असलेले खाद्यपदार्थ आहारात घ्यावेत. तसेच झोपण्यापूर्वी लगेचच जेवण करावे, जेणेकरून रात्री अपचन होणार नाही. अतिसडपातळ व्यक्तींनी सुका मेवा, तेलबिया म्हणजेच बदाम, अक्रोड, शेंगदाणे आणि कडधान्यांचे जास्त प्रमाणात खावे. यातून त्यांना अनसॅच्युरेटेड फॅटी अँसिड मिळते. या चांगल्या फॅटमुळे त्यांची प्रकृती सुधारते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु