शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीरयष्टी खुपच किरकोळ असल्यास व्यक्तीमत्व भारदस्त वाटत नाही. शिवाय,आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभावसुद्धा पडत नाही. यासाठी वजन वाढवायचे असल्यास काही खास घरगुती उपाय आहेत. हे उपाय केल्यास वजन वाढू शकते.

करा हे उपाय

१) आहार घेण्याचे प्रमाण वाढवा. दिवसातून तीन वेळा संपूर्ण जेवण व अधून-मधून काहीतरी खा.

२) दिवसाची सुरुवात पोटभर नाश्त्याने करा. दर दोन ते तीन तासांनी काहीतरी खा.

३) सकाळी सुकामेवा दुधात उकळून प्या. बदाम, खजूर व अंजीर यांच्यासोबत गरम दूध प्या. दररोज किसमिस खा.

४) शेंगा खा. वाटीभर शेंगांमध्ये ३०० कॅलरी असतात. हा पौष्टिक आहार आहे.

५) दिवसभरात तीन केळी खा. दूध व दह्यासोबत केळी खाऊ शकता. बनाना मिल्क शेक घ्या.

६) नाश्त्याच्या वेळी व झोपण्यापूर्वी दुधात मध मिसळून प्या.

७) पिनट बटरमधील मोनो अनसॅच्युरेटेड फॅट वजन वाढवते.

८) खरबूज खाल्ल्याने वजन वाढते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु