चहा-चपातीचा नाष्टा आरोग्यदायी आहे का ? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या

चहा-चपातीचा नाष्टा आरोग्यदायी आहे का ? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शहर असो की ग्रामीण भाग, आपल्या महाराष्ट्रात चहा-चपातीचा नाष्टा अनेक घरांमध्ये केला जातो. काही घरांमध्ये तर वर्षानुवर्षे ही परंपरा चालत आलेली असते. पोटभर चहा-चपाती खाल्ली की जेवण उशीरा मिळाले तरी चालते असे अनेकजण सांगतात. परंतु, हा नाष्टा खरंच आरोग्यदायी आहे का, याबाबत आहारतज्ज्ञांना विचारले असता ते काय सांगतात, हे आपण जाणून घेणार आहोत.

काय सांगातात आहारतज्ज्ञ

१) चहा चपाती एकत्र खाल्ल्याने त्यामधून मिळणारी पोषकद्रव्य फारच कमी असतात.

२) हा नाष्टा फारसा आरोग्यदायी नाही.

३) सकाळी उठल्यानंतर शरीराला दिवसभर लागणारी उर्जा सकाळच्या नाश्त्यामधून मुबलक मिळते. म्हणून सकाळच्या नाष्टा उर्जादायक असावा.

४) चहात कॅफिन असल्याने हे पेय घेतल्यास दिवसाची सुरवात आरोग्यदायी होत नाही.

५) कोणताही अन्नपदार्थ चहासोबत घेणे शरीररसाठी त्रासदायकच आहे.

६) चहा चपाती या कॉम्बिनेशनमधून आयर्न आणि कॅल्शियम शरीरात मुबलक प्रमाणात शोषले जात नाही.

७) सकाळी गरज असलेले काबोर्हायड्रेट आणि प्रोटीन या नाष्ट्यातून मिळत नाहीत.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु