शरीरावर पडलेले ‘निळे’ डाग देतात ‘या’ आजरांचे संकेत

शरीरावर पडलेले ‘निळे’ डाग देतात ‘या’ आजरांचे संकेत

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्याला कधी कुठे धक्का लागला किंवा मुका मार लागला तर ज्या ठिकाणी मार लागला त्या जागेवर निळे डाग पडतात. मार लागलेली ही जागा काही दिवसात बरी होते. पण ते निळे डाग तसेच राहतात. हे निळे डाग अनेक आजरांचे संकेत असतात. त्यामुळे या डागांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका.

१) हे निळे डाग आपल्या शरीरातील अ‍ॅस्प्रिन,क्युमाडीन,अल्कोहोल ही स्थिती अजूनच वाईट करण्यास मदत करतात.काही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता असे डाग पडण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे जखमा न भरणे तसेच रक्त साखळून राहणे अशा समस्या आढळतात.

२) त्वचा आणि रक्तधमन्यांमध्ये इजा झाल्यावर रक्त साकळण्याची क्रिया रोखण्यासाठी व्हिटामिन सी ची गरज असते. त्यामुळे  या व्हिटामिनच्या कमतरेमुळे जखमा पुरेशा प्रमाणात व लवकर भरून येत नाहीत.

३) झिंक, आयर्न अशा आवश्यक मिनरल्सचा जखम भरून काढण्यासाठी फायदा होतो. मात्र आयर्नच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमियाचा त्रास होण्याचीदेखील शक्यता असते. परिणामी शरीरावर निळसर डाग पडतात.

४) वॉन विल्लेब्रांड  हा एक अंतर्गत रक्तप्रवाहाचा आजार आहे. यामुळे ब्लड क्लॉट होण्याची तसेच एखाद्या अपघातानंतर सतत रक्तप्रवाह होणे, रक्तप्रवाह न थांबणे अशा समस्या आढळतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु