निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – निरोगी आरोग्य जगण्यासाठी अनेक आहारतज्न आपल्याला अनेक टिप्स देत असतात. त्यामुळे आपल्याला नेमके कोणते पदार्थ खावेत हेच समजत नाही. आपण चांगलं आरोग्य जगण्यासाठी अनेक टिप्स उपयोगात आणत असतो. पण त्या टिप्स आपण जर नियमित फॉलो केल्या नाहीत. तर यांचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे खाली दिलेल्या पदार्थांचा जर तुमच्या आहारात समावेश केला. तर तुमचं आरोग्य नक्कीच निरोगी आणि सुदृड राहू शकत.

निरोगी आरोग्य जगण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा 

१) निरोगी आरोग्य जगण्यासाठी आपल्या आहारात आपण कडधान्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. कारण कडधान्यापासून आपल्याला खूप जास्त लोह मिळत. आणि हरभरा, चवळी, मटकी, वाटाणा या पदार्थात फायबर असल्यामुळे ते वजन कमी करण्यास मदत करते.

२) पालेभाज्याही निरोगी आरोग्यासाठी चांगल्या असतात. त्यामुळे आपण आपल्या आहारात नेहमी पालेभाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. तसेच पालेभाज्यांमध्ये लोह आणि कॅल्शियम असल्यामुळे रक्तवाढीला आणि हाडे बळकट होण्यासाठी पालेभाज्या खूप असतात.

३) आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी भोपळ्याच्या बिया या खूप उत्तम असतात. कारण यामध्ये ‘क’ जीवनसत्व असत. हे निरोगी आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे.

४) तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात किंवा पुलावचा उपयोग केला तर ते हि तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण त्यामध्येही भरपूर प्रमाणात लोह असते.

५) आपण म्हणतो कि चॉकलेट आरोग्यासाठी चांगले नसते. परंतु तुम्ही जर डार्क चॉकलेटच खाल्ले तर यामध्ये भरपूर कॉपर, मॅग्नेशियम आणि फायबर असते. त्यामुळे तुम्ही कायम निरोगी राहू शकता.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु