अर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

अर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : अर्थरायटिसमध्ये सूज,वेदनेसह शरीर आखडते. हाडांना कमजोर करून शरीर कुरूप करणारा हा आजार आहे. या आजारात सांध्यांमध्ये खूप वेदना होतात. अर्थरायटिसच्या रुग्णांनी खाण्या-पिण्यात काही पदार्थांचा समावेश केला आणि त्यांचे नियमित सेवन केले तर या रोगात आराम मिळतो. तसेच वेदनाही कमी होऊ शकताता.ब्रोकली आणि कोबीमध्ये प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायडेट, लोह, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि क्रोमियमसारखे पौष्टिक तत्त्वे भरपूर असतात. ब्रोकली खाल्ल्यास रक्तातील साखरेचा स्तर सामान्य राहतो. यातील फायटोकेमिकल्स आजार आणि इन्फेक्सनपासून बचाव करतात.

फूल कोबीमध्येही अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडेंट्स असतात. जे नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. लसूण हा जेवण स्वादिष्ट करण्याबरोबरच जिवाणूंपासून रक्षण करतो. यामध्ये प्रतिजैविके, जिवाणू प्रतिबंधक तसेच बुरशीजन्य प्रतिबंधक घटक असतात. शिवाय लसनातील अनेक अँटी ऑक्सिडंट्स शरीराला कर्करोग, अर्थरायटिस इत्यादी गंभीर रोगांपासून वाचवतात. अर्थरायटिस झालेल्यांनी रोज जेवणात लसणाच्या पाकळ्या खाणे खूपच फायद्याचे आहे.

अर्थरायटिसच्या रुणांनी वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या व फळे नियमित खाल्ल्यास त्याचा फायदा होतो. दाट रंगांची फळे आणि भाज्यांमध्ये अनेक पौष्टिक तत्त्वे असतात. शिवाय यात बऱ्यापैकी अँटी-ऑक्सिडंट्सची मात्राही असते. त्यामुळेच दाट रंग असलेली फळे आणि भाज्या नियमित आहारात घेतल्या तर या आजारावर बऱ्यापैकी उपयोग होतो. हळद ही एक नैसर्गिक प्रतिजैविक असून यात करक्युमिन नावाचे तत्त्व असते जे विषाणूंना मज्जाव करते. त्यामुळे अर्थरायटिसचा आजार असणाऱ्यांनी हळदीचा वापर केल्यास खूप फायदा होतो. हळदीत अनेक औषधी गुण असतात, ज्यांचा उपयोग त्वचा, पोट व शरीराच्या अनेक आजार बरे करण्यासाठी होऊ शकतो. ओमेगा-३ अ‍ॅसिडचे सेवन हे अर्थरायटिसच्या आजारापासून बचावासाठी फायद्याचे असते. धमण्या रुंद होण्यास याचा उपयोग होतो. यामुळे धमण्यांतून रक्तप्रवाह चांगला होतो. यातील एन्झाइम्स फॅट हे पचनसंस्थेला मजबूत करण्यास फायदेशीर आहे. माशांचे तेल, अल्गी तेल, सॅमन नावाचा मासा यात ओमेगा-३ भरपूर प्रमाणात असते. जवस, अक्रोड, मोहरीचे तेल व बेरीचा आहारात समावेश केल्यास शाकाहारींना ओमेगा ३ मिळू शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु