अशा प्रकारे ‘हे’ तेल लावा आणि सुंदर दिसा, एकदा अवश्य करा ‘हे’ उपाय

अशा प्रकारे ‘हे’ तेल लावा आणि सुंदर दिसा, एकदा अवश्य करा ‘हे’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – थंड हवामानामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. अशावेळी कॉस्मेटिक्स न वापरता नैसर्गिक उपाय केले पाहिजेत. ऑलिव्ह ऑइल वापरून त्वचेच्या अशा अनेक समस्या दूर करता येतात. ऑलिव्ह ऑइल त्वचेसाठी खुप लाभदायक आहे. हे तेल जेवणासाठी वापरल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.

असा करा उपाय

चेहरा उजळतो
चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. ऑलिव्ह ऑइलने मसाज करा. यानंतर अर्धा चमचा साखर घेऊन चोळा. शेवटी कोमट पाण्यात एक कपडा भीजवून चेहरा पुसून घ्या. काही दिवसात चेहरा उजळतो.

नखांचे सौंदर्य
नखे तासभर ऑलिव्ह ऑइलमध्ये बुडवून ठेवा. यामुळे नखांचे क्यूटिकल्स मऊ आणि लवकचीक होतात. पायांना स्वच्छ करुन त्यावर ऑलिव्ह ऑइल लावून कॉटनचे सॉक्स घालून झोपा. यामुळे पेडीक्योरची गरज नाही.

केसातील कोंडा
थोडेसे ऑलिव्ह ऑइल हातांवर घेवून केसांना लावल्याने केस सिल्कि होतात. कोंड्याची समस्या दूर होते.

सुंदर ओठ
ओठांवर ऑलिव्ह ऑइलने हलकी मालिश केल्याने ओठ कोमल होतील.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु