बाथरुममध्‍ये तुम्‍ही सुद्धा करत नाही ना ‘ही’ चुक ? होऊ शकते नुकसान, जाणून घ्या

बाथरुममध्‍ये तुम्‍ही सुद्धा करत नाही ना ‘ही’ चुक ? होऊ शकते नुकसान, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बाथरुममध्ये आंघोळ करताना आपल्याकडून नकळत अशा काही चुका होतात, ज्यामुळे आरोग्‍यावर गंभीर परिणाम होतात. वेळीच या चुका सुधारल्‍या तर हे गंभीर आजार टाळता येऊ शकतात. बाथरूममध्ये कोणत्या चुका नकळत आपल्याकडून होतात, ते जाणून घेवूयात.

फूल शॉवरखाली चेहरा धुणे
चेहऱ्याची त्‍वचा खूप नाजूक आणि संवेदनशिल असते. शॉवर पूर्ण चालू असेल तर त्‍याच्‍या वेगाने येत असलेल्या धारांमुळे त्‍वचा आणि डोळ्याला इजा होऊ शकते.

अँटीबॅक्‍टेरियल साबण
अँटीबॅक्‍टेरियल साबणामुळे त्‍वचेवरील बॅक्‍टेरिया नाहीसे होतात मात्र यामुळे त्वचा कोरडी आणि खरखरीत होऊ शकते. त्‍वचेनूसार नेहमी साबण वापरावा.

खूप गरम किंवा थंड पाणी
यामुळे त्‍वचा आणि केसांच्‍या पेशींचे नुकसान होते. त्‍वचा जळण्‍याचा किंवा संवेदनशील होण्‍याचा धोका असतो.

बॉडी स्‍क्रबर
आंघोळीनंतर बॉडी स्‍क्रबर बाथरुममध्‍येच ठेवल्याने त्‍यात बॅक्‍टेरिया वाढू शकतात. आरोग्‍यासाठी हे अतिशय हानिकारक आहे.

ब्रश
दात घासल्‍यानंतर ब्रश बाथरूममध्येच ठेवल्याने त्‍यात बॅक्‍टेरिया वाढण्‍याचा धोका असतो. हे बॅक्‍टेरिया तोंडातही जाऊ शकतात. यामुळे ब्रशला स्‍वच्‍छ करुन खुल्‍या जागेत ठेवावे.

त्‍वचेला रगडणे
अंग पुसण्‍यासाठी टॉवलने त्‍वचा रगडल्याने त्वचा कोरडी होऊ शकते व केसही गळतात.

शाम्‍पू वापरणे
केमिकल्सयुक्त शाम्‍पू रोज वापरल्‍याने केसांच्‍या मुळांची हानी होते. केस कोरडे आणि पांढरे होऊ शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु