हिवाळ्यात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी नियमित करा सेवन

हिवाळ्यात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी नियमित करा सेवन

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  हिवाळा सुरू झाला की काही छोटे-छोटे आजार नेहमी त्रासदायक ठरतात. यासाठी हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे ठरते. विशेषता लहान मुले, वृद्ध आणि महिलांनी ही काळजी घेतली पाहिजे. आरोग्य चांगले असेल तरच तुम्हाला गुलाबी थंडीचा आनंद घेता येईल. म्हणूनच आहारात काही खास गोष्टींचा समावेश करा.

हे पदार्थ आवश्य खा
बटाटे आणि रताळी
यातील पोषक तत्त्वे, व्हिटामिन सी, बी ६ गरोदर स्रीया तसेच मुलांसाठी उपयुक्त असते. यातील अ‍ँटीऑक्सिटंड्स तसेच स्टार्च हिवाळ्यात आरोग्यदायी असते.

हिरव्या भाज्या
हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या नियमित सेवन करा. यातील व्हिटामिन ए, सी आणि के लाभदायक आहे.

दुध, दही, तुप
हिवाळ्यात या पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवा. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.

डाळींब
हिवाळ्यात डाळींब खाणे उत्तम आहे. बॅड कॉलेस्टेरॉलवर नियंत्रण राहते. यात अँटीऑक्सीडंट्स भरपुर असल्याने हे आरोग्यदायी आहे.

सुका मेवा
यातून शरीराला ऊर्जा आणि ऊब मिळते. काजू, बदाम, पिस्ता, मनुका, अंजीर, अक्रोड नियमित सेवन करा.

आंबट फळे
संत्र, मोसंबी, लिंबु ही फळे थंडीत सेवन करा. ही फळे गुड कोलेस्टेरॉल वाढवतात.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु