केवळ ७ दिवसात आत जाऊ शकते पुढे आलेले पोट, करा ‘हे’ सोपे ११ उपाय

केवळ ७ दिवसात आत जाऊ शकते पुढे आलेले पोट, करा ‘हे’ सोपे ११ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणामुळे हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होऊ शकतात. यासाठी वजन कमी ठेवणे खुप गरजेचे आहे. लठ्ठपणा दूर ठेवल्यास आपोआपच आरोग्य चांगले राहते, यासाठी अनेकजण व्यायाम आणि योग्य आहार घेत असतात. परंतु, डायटिंग आणि जिममध्ये घाम गाळूनही काही जणांचे वजन कमी होत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचा डाएट चार्ट चूकीचा असतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी होऊ शकते. ७ दिवसात वजन करण्यासाठी हे उपाय आवश्य करा.

हे उपाय करा

* टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.

* पपईचे नियमित सेवन करावे. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

* दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.

* पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.

* आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होते.

* दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी ४ किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली करा.

* बटाटे, मैदा, साखर, तांदूळ कमी करा आणि  डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई खाण्यावर जास्त भर द्या.

* जेवणात वरून मीठ घेऊ नये. मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करू नये.

* दिवसभराच्या आहारात सर्वात जास्त फोकस ब्रेकफास्टवर करा. नियमितपणे ब्रेकफास्ट केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

* दररोज सकाळी एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे मध टाकून घेतल्यास शरीरातील वसा कमी होतो.

* सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु