कुत्रा चावल्‍यास तात्‍काळ करा ‘ही’ ५ कामे, इन्फेक्शनचा धोका होतो कमी

कुत्रा चावल्‍यास तात्‍काळ करा ‘ही’ ५ कामे, इन्फेक्शनचा धोका होतो कमी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कुत्रा चावणे हे अतिशय धोकादायक असते. यामुळे रॅबिजसारखी समस्या होऊ शकते. म्हणूनच कुत्रा चावल्यास तातडीने योग्य ते प्राथमिक उपचार करावेत. अशावेळी योग्य प्राथमिक उपचार न केल्यास इन्फेक्शनचा धोका वाढतो. कुत्रा चावल्यानंतर कोणते प्राथमिक उपचार करावेत, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

अशी घ्या काळजी

१ जर जखमेतून रक्त येत असेल तर ते दाबून ठेवू नका. थोडा वेळ रक्त जाऊ द्या.

२ ज्या ठिकाणी चावा घेतला आहे, ती जखम स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे बॅक्टेरिया जमा होणार नाहीत.

३ जखमेवर अँटीबायोटिक क्रिम लावा. यामुळे इन्फेक्शन सर्वत्र पसरणार नाही.

४ यानंतर जखमेवर बँडेज लावा. यामुळे हवेतील बॅक्टेरिया जखमेवर येणार नाहीत.

५ या प्राथमिक उपचारानंतर तोबडतोब डॉक्टरांकडे जा. त्यांच्या सल्ल्यानुसार इंजेक्शन आणि उपचार घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु