‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्यात मक्याचं कणीस खाणे हे तर सर्वांनाच आवडत. आणि मका ही आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर असते. त्यामुळे तिचा आपण आहारात समावेश केलाच पाहिजे. परंतु, आपण जर मक्याचं कणीस खाल्यावर लगेच पाणी पिलो तर मात्र हे कणीस खाणे तुम्हाला महागात पडणार आहे. जाणून घ्या की मक्याचं कणीस खाल्यावर लगेच पाणी पिल्याने याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो.

१) मक्याचं कणीस खाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या होऊ म्हणजेच ब्लोटिंग होऊ शकतं.

२) कणीस खाऊन झाल्यावर आपल्याला लगेच तहान लागते. पण यामुळे आपले पचनतंत्र कमजोर होण्याचाही धोका असतो.

३) मक्याचं कणीस खाऊन लगेच पाणी पिल्याने गॅस्ट्रोपॅरीसिसस या रोगाला आमंत्रण मिळत. यामुळे पोटात दुखणे आणि गॅस होणे ही समस्या होते.

४) या कारणामुळे ती व्यक्ती जेवणही करु शकत नाही. मक्याच्या दाण्यांमध्ये कार्बोस आणि स्टार्च भरपूर प्रमाणात असतात. जेव्हा या दोन्ही तत्वांमध्ये पाणी मिसळतं तेव्हा पोटात गॅस जमा होते.

५) मक्याचं कणीस खाल्यानंतर साधारण ४५ मिनिटांनी पाणी प्यावे. किंवा कणीस खाण्याआधीही पाणी पिऊ शकता. असे केल्याने तुम्हाला त्रास होणार नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु