तुमच्या मुलास ‘मायक्रोन्युट्रिअंट डेफिशिअन्सी’ तर नाही ना ! अशी घ्या काळजी

तुमच्या मुलास ‘मायक्रोन्युट्रिअंट डेफिशिअन्सी’ तर नाही ना ! अशी घ्या काळजी

आरोग्यानामा ऑनलाइन टीम :  मूल अ‍ॅक्टिव्ह नाही, त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत वाढ कमी आहे, हालचाली मंद वाटतात, अशा तक्रारी असतील मुलाला मायक्रोन्युट्रिअंट डेफिशिअन्सी असू शकते. परंतु, ही समस्या भारतात अनेक मुलांमध्ये आढळून येते, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मुलांची नीट काळजी न घेतल्याने ही समस्या होते.

हे लक्षात ठेवा
१ मुल गुटगुटीत होण्यासाठी त्याला सारखं खायला घालू नका. तुम्ही जे खायला देता त्यामध्ये किती फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्सचाच समावेश आहे, हे सुद्धा तपासले पाहिजे. ज्या सूक्ष्म घटकांची शरीराला आवश्यकता असते, त्याबाबतही लक्ष द्या.

२ लोह, झिंक, आयोडिन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १२, फोलेट इत्यादि अनेक मायक्रोन्युट्रिअंटची मुलांना आवश्यकता असते. तुमच्या मुलांना ते मिळतात का, हे तपासा.

३ मुलांच्या वाढीत या मायक्रोन्युट्रिअंट्सचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. पहिल्या हजार दिवसांत, म्हणजेच साधारण तीन वर्षे वयापर्यंतच्या मुलांच्या वाढीत त्यांची भूमिका अनन्यसाधारण असते.

४ या काळात जर मुलांना व्यवस्थित पोषक द्रव्ये मिळाली, तरच त्यांची वाढ योग्यरित्या होते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु