मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी

मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लठ्ठपणा आणि मधुमेह हे दोन आजार सध्या सर्व वयोगटात दिसून येत आहेत. शिवाय, याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गंभीर बाब म्हणजे मुलांमध्ये सुद्धा हे आजार आढळून येत असल्याने त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे खुप आवश्यक आहे. असंतुलित आहार हे याचे मुख्य कारण आहे. मुलांना पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे. मुलांना कोणता आहार द्यावा, याविषयी जाणून घेवूयात.

१) केळी
Image result for केळी

मुलांना नियमित केळी खाण्यासाठी द्या. केळीमुळे लठ्ठपणा वाढतो हा भ्रम आहे. यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असल्याने त्यांच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

२) पालक
Image result for पालक

मुलांना हिरव्या भाज्या द्या. पालक शरीरासाठी सर्वात महत्त्वाची भाजी आहे. मुलांना पालकाचे सूप, डाळ, चपाती आणि भाजी आदी कोणत्याही रूपात दररोज अवश्य द्या.

३) जंक फूडला बायबाय
मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी

तळलेले पदार्थ, जंक फूड मुलांना अजिबात देऊ नका. यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि प्रकृती बिघडते.

४) दूध
Image result for दूध

रात्री झोपण्यापूर्वी मुलांना एक कप कोमट दूध अवश्य प्यायला द्या. शक्य झाल्यास यात चिमूटभर हळदही घाला.

५) फॅट्स
Image result for फॅट्स

शरीराच्या विकासासाठी फॅट‌्स खूप गरजेचे आहे. फॅट्समुळे लठ्ठपणा येतो, हे खरे नाही. चांगले फॅट्स शरीराच्या संपूर्ण विकासात मदत करतात. मुलांना तूप, बटर, काजू, बदाम द्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु