स्मार्टफोनचा अतीवापर केलात तर लवकर होऊ शकता म्हातारे, जाणून घ्या

स्मार्टफोनचा अतीवापर केलात तर लवकर होऊ शकता म्हातारे, जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाइन टीम : स्मार्टफोनचा अतिवापर करणे हे अतिशय धोकादायक आहे. स्मार्टफोन उपयोगी असला तरी त्याचे धोके सुद्धा जास्त आहेत. स्मार्टफोनचा अतिवापर केल्यास लवकर वृद्धावस्था येऊ शकते. यामुळे तरुणपणातच लोक ८० वर्षाच्या वृद्धाप्रमाणे चालू, वागू लागतात. तसेच कंबर, मानेच्या वेदनांसारखे विविध आजार होऊ शकतात, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

चालताना स्मार्टफोनचा वापर केल्यास चालण्याचा वेग कमी होतो, आणि एखाद्या ८० वर्षाच्या वृद्धाप्रमाणे लोक चालतात.

स्मार्टफोनवर बोलत चालणारी माणेस दारु पिऊन चालत असल्यासारखी भासतात.

नेदरलँड, चीनमध्ये स्मार्टफोनवर बोलत चालणारांसाठी खास वेगळा फूटपाथच तयार करण्यात आला आहे.

स्मार्टफोनमुळे नात्यांमध्ये दुरावा येत आहे.

लोक स्मार्टफोनमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवत असल्याने अनेक नाती संपत चालली आहेत.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु