‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पोटात सतत गॅस होत असल्यास दिवस खराब जातो. कोणतेही काम व्यवस्थित करता येत नाही. अनियमित दिनचर्येमुळे ही समस्या उद्भवते. पोटात नेहमी गॅस होत असल्यास काही खास घरगुती उपाय करता येतात. हे उपाय केल्यास ही समस्या सहज दूर होते. मळमळ, उलटी, वारंवार उचकी लागणे, पोटदुखी आणि सूज ही पोटात गॅस झाल्याची सामान्य लक्षणे आहेत.

हे उपाय करून पहा

एसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी थोडेसे मेथी दाणे, हळद, हिंग आणि जिरे बारीक करावे. सकाळी जेवण केल्यानंतर ताकामध्ये हे चूर्ण टाकून प्यावे.

हळद अँटीबायोटिक आहे. त्वचा, पोट, आणि शरीरातील विविध आजारांवर हळद रामबाण उपाय आहे. थोडीशी हळद थंड पाण्यातून घेवून त्यावर दही किंवा केळे खावे.

गॅसची समस्या दूर करण्यात बटाटा उपयोगी आहे, हे अनेकांना खरे वाटत नाही. पण, बटाट्याचा रस पिल्यास गॅसची समस्या दूर होते. बटाटा एल्कलाइनचा उत्तम स्रोत आहे. कच्चे बटाटे सोलून त्यामध्ये पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावेत. गाळून घेऊन त्यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकावे. हा ज्यूस लिव्हरसाठी सुद्धा उपयुक्त आहे.

गॅसची समस्या दूर करण्यासाठी अर्धा ग्रॅम काळे मिरे बारीक करून त्यामध्ये मध टाकवे. या मिश्रणाचे सेवन केल्यास आराम मिळतो.

दररोज तुळशीची पाच पाने खाल्ल्यास पोटातील गॅसची समस्या तसेच इतर पोटाचे आजार बरे होतात. गॅस समस्येमध्ये तुळशीचा चहा प्यावा.

पाणी न पिणे किंवा शरीरात पाण्याची कमतरता यामुळे गॅस होतो. गॅसची समस्या नसेल तरीही दिवसात कमीतकमी आठ ग्लास पाणी प्यावे. गॅसची समस्या असल्यास जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे.

नारळ पाण्यात व्हिटॅमिन आणि पोषक तत्व भरपूर असतात. पोटात गॅसची समस्या असल्यास दोन-तीन वेळेस नारळाचे पाणी प्यावे.

गॅसच्या समस्येवर आले हे एक रामबाण औषध आहे. आले टाकून केलेला चहा प्यावा. आल्यात अँटीबॅक्टिरीअल आणि अँटीइंफ्लामेंट्री तत्व असतात. यामुळे पोटातील गॅसची समस्या ताबडतोब दूर होते. सुकलेल्या आल्याचा काढा करून प्यायल्यास लवकर आराम मिळतो.

अननसात तंतुमय पदार्थ, पाचक एन्जाइम्स आणि एल्कलाइनचे प्रमाण जास्त असते. यामुळे याचे सेवन केल्यास गॅसची समस्या दूर होते. यासाठी पिकलेले अननस खावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु