कफचा त्रास असेल तर खावे ‘हे’ फळ, जाणून घ्या इतरही अनेक आरोग्य फायदे

कफचा त्रास असेल तर खावे ‘हे’ फळ, जाणून घ्या इतरही अनेक आरोग्य फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्रात चिकूचे उत्पादन मोठ्याप्रमाणात होते. मधूर चवीमुळे चिकू सर्वांनाच आवडतो. याच्या सेवनाने उत्साह, चैतन्य निर्माण होते. यामध्ये मोठ्याप्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. चिकूचा रस रक्तात मिसळून उर्जा निर्माण करतो. चिकूची साल ताप नाशक आहे. आतड्यांचे आजार, कफ, श्वसन मार्गातील अडथळे, खोकला, सर्दी, या आजारात चिकू प्रभावी उपाय आहे.

हे आहेत फायदे

चिकुतील पॉलिफेनॉलिक या घटकामुळे मूळव्याध, अन्ननलिका दाह, जुलाब आजारात आराम मिळू शकतो.

चिकुमधील व्हिटॅमिन ई मुळे त्वचा स्वस्थ आणि सुंदर होते. याच्या बियांचे तेल केस वाढीसाठी फायदेशीर आहे.

चिकू थंड, पित्तनाशक, पौष्टिक, गोड फळ आहे. जेवणानंतर चिकूचे सेवन करावे. हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण मिळते.

मानसिक स्वास्थ्य आणि डोक शांत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. तणाव कमी होण्यास मदत होते. अनिद्रा, चिंता, आणि तणाव कमी होतो.

प्रसूतीनंतर अंगावर जास्त प्रमाणात दूध येण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे.

डोळ्यांची शक्ती वाढते. चिकुमध्ये ग्लुकोजची मात्राही चांगली असल्याने उर्जा मिळते.

कॅल्शिअम, आयर्न आणि फॉस्फरसची चांगली मात्र असल्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी चिकू लाभदायक आहे.

चिकुमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यामधील अँटीऑक्सीडेन्ट घटक शरीरातील विषाणूंना नष्ट करतात. पोटॅशियम, आयर्न, फॉलेट, आणि नियासिन हे घटक पचनक्रियेला स्वस्थ ठेवतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु