मोजे काढताच पायांची दुर्गंधी येत असल्यास करा ‘हे’ खास उपाय, समस्या होईल दूर

मोजे काढताच पायांची दुर्गंधी येत असल्यास करा ‘हे’ खास उपाय, समस्या होईल दूर

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शूज आणि मोजे दिवसभर घातल्याने काहींच्या पायांना दुर्गंधी येते. यामुळे घरात आणि बाहेर अनेकदा अशा लोकांना लाजिरवाण्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. ही समस्या दूर करायची असल्यास काही सोपे घरगुती उपाय असून हे उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत उपाय

१) रोज अंघोळ झाल्यानंतर पायांना पावडर लावल्याने पायांना घाम येणार नाही. यामुळे दुर्गंधी दूर होते.

२) नेहमी नॉयलॉन आणि कॉटनचे मोजे वापरा. यामुळे पाय कोरडे राहतात. दुर्गंधी येत नाही.

३) शूज काढल्यानंतर कोमट पाण्यात मीठ टाकून त्यात पंधरा ते वीस मिनिटे पाय बुडवून ठेवा. यामुळे दुर्गंधी दूर होईल. थकवा दूर होतो.

४) पाण्यात व्हिनेगर टाकून यात तीस मिनिटे पाय टाकून ठेवा. यामुळे दुर्गंधी दूर होते. तसेच थकवासुद्धा दूर होतो. यामुळे बॅक्टेरियाचे संक्रमण होणार नाही.

५) एक ग्लास पाण्यात दोन टी बॅग टाका. या पाण्याला सामान्य पाण्यात मिसळून तीस मिनिटे पाय यात ठेवा. यामुळे दुर्गंधी दूर होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु