‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रणयाबाबत अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न घोळत असतात. यामुळे तारूण्यात अनेकदा संभ्रमावस्था सुद्धा निर्माण शक्यता असते. यासंदर्भात आपल्याकडे मोकळेपणाने चर्चा होत नसल्याने काही प्रश्न मनात कायम राहतात. अशाच काही प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.

पहिल्यावेळी प्रणय करताना वेदना होतात का?

* तसे होणे गरजेचे नाही. तरुणी तणावात नसेल आणि उत्तेजित असेल तर वेदना होत नाहीत. दोघांपैकी कोणीही घाई केली नाही तर तसे होत नाही.

लवकर डीस्चार्ज होण्याचे कारण काय?

* प्रणय ही खूप रोमांचक बाब असते. नवीन असेल तर आणखी जास्त. त्यामुळे अनेकांना इच्छा असली नसली तरी लवकर ऑर्गझमचा आनंद मिळतो. त्याची काळजी करण्याचे कारण नाही. अनुभवातून बरेच बदल होतात.

प्रणयानंतर चांगली स्वच्छता केली तर रोगांपासून बचाव होऊ शकतो का?

* नाही, लघुशंका केल्याने किंवा स्वच्छता केल्याने धोका कमी होत नाही. जोडीदाराला रोगाची लागण झालेली असेल तर त्याची लागण होऊ शकते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडून तपासणी करावी आणि पुढच्या वेळी कंडोमचा वापर करावा.

डेन्टल डॅम म्हणजे काय, कुठे मिळेल?

* डेन्टल डॅम हा रबराचा एक तुकडा असतो. त्याचा वापर मुखमैथून करताना होतो. त्याला डेन्टल डॅम म्हणतात कारण त्याचा वापर दातांच्या उपचारासाठी करण्यात येतो. प्रणयासाठी नव्हे. इंटरनेटद्वारे प्रत्यक्ष डेन्टल डॅम खरेदी केले जाते.

सुरक्षित प्रणय करूनही संभोगातून पसणारा रोग होऊ शकतो का?

* सुरक्षित प्रणय करणे म्हणजे कंडोम वापरण्याने केवळ एचआयव्हीचे विषाणू किंवा क्लेमायडिया आणि गोनोरिया सारख्या संक्रमणांपासून बचाव होतो. तरीही इतर मार्गांनी इतर विषाणू प्रणयादरम्यान शरिरात प्रवेश करतात. अगदी शरिराच्या काही भागांना प्रणयादरम्यान स्पर्श केल्याने किंवा हात लावल्यानेही अशा प्रकारच्या रोगांची लागण होण्याची शक्यता असते.

प्रणयाचा पहिला अनुभव सुखद कसा बनवावा ?

*
हा प्रत्येकाचा वैयक्तीक अनुभव असतो. प्रत्येकाला वेगळ्या गोष्टींनी आनंद मिळतो. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या साथीदाराला आनंद कशात मिळतो, त्याकडेच लक्ष द्या.

पहिल्या प्रणयाने गर्भधारणा होऊ शकते का?

*
हो, पहिल्या प्रणयानेही गर्भधारणा होऊ शकते. अगदी त्यापूर्वी कधीही मासिक पाळी आलेली नसेल किंवा असेल तरीही. त्यामुळे कंडोमचा वापर करावा.

काहींना ऑर्गझमची जाणीव का होत नाही?
* मुलींना असे होण्याची जास्त शक्यता असते. त्याची अनेक कारणे असू शकतात. साथीदाराबरोबर आनंद घेणे महत्त्वाचे आहे. अनेकदा हा प्रकार मानसिकही असतो. प्रणयादरम्यान याची ठरावीक अशी वेळही नसते.

गर्भधारणा टाळण्यासाठी ऑर्गझपूर्वी थांबणे योग्य आहे का?
* नाही. कारण त्यामुळे रोगांचे संक्रमण आणि गर्भधारणेची शक्यता कमी होत नाही. तो धोका कायम राहतो. कारण शुक्राणुंचे संक्रमण होण्याची शक्यता कायम असते.

कौमार्य कशाला म्हणतात?
* एखादी मुलगी किंवा मुलगा यांनी प्रणय केला नसेल तर त्यांचे कौमार्य कायम आहे असे म्हणतात. प्रत्यक्ष प्रणय झाल्यानंतर कौमार्य भंग झाले असे म्हणतात. पण त्यात संभोगाची प्रक्रिया पूर्ण झालेली असावी.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु