दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी

दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दाढदुखत असल्यास त्याचा आपल्या कामावर आणि एकुणच दिवसावर परिणाम होतो. तसेच हा त्राससुद्धा असह्य असतो. दाढ दुखत असल्यास काही घरगुती उपाय केल्यास आराम मिळू शकतो. तसेच ही समस्या होऊ नये म्हणून नेहमी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. जाणून घेवूयात दाढदुखीवरील उपाय आणि खबरदारी.

हे आहेत उपाय

* तुळशीची ५ ते १० पाने स्वच्छ धुवून, कुटून त्याचा रस काढा. यामध्ये कापराच्या ३ ते ५ वड्या मिसळा. कापसाचे छोटे छोटे ३ ते ४ बोळे या मिश्रणात भिजवून दाढेत ठेवा.
* दाढदुखीवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन दाढ नेमकी का दुखते, यावर योग्य उपचार घ्या.

अशी घ्या काळजी

* जास्त थंड, गरम आणि कडक पदार्थ खाऊ नका.
* मुलांना चॉकलेट, गोड पदार्थ देणे टाळा.
* जेवण झाल्यानंतर खळखळून चूळ भरा.
* सकाळी आणि रात्री दात स्वच्छ करा.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु