छातीत दुखत असेल तर करा ‘हे’ ४ घरगुती उपाय; जाणून घ्या 

छातीत दुखत असेल तर करा ‘हे’ ४ घरगुती उपाय; जाणून घ्या 

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेक जणांना कामाचा लोड खूप जास्त असतो. त्यामुळे जे लोक अति मेहनतीचं काम करतात त्यांना छातीत दुखण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. कधी कधी पित्ताच्या समस्येने ही अनेकांच्या छातीत दुखत. पण अनेकदा छातीत दुखण्याची कारणे अनेक असतात. त्यामुळे तुम्ही छातीत दुखण्याच्या समस्येकडे कधीच दुर्लक्ष करू नका. यासाठी आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

१) तुमच्या छातीत दुखत असेल तर तुम्ही लघू पथ्यकर, सात्त्विक आहार घ्यावा. कमी तेल, तूप, साखर असलेले पदार्थ खावेत. जेवणात दुधीभोपळा, पडवळ, दोडका, गवार, तांबडा भोपळा, चाकवत, राजगिरा या भाज्या उकडून खाव्यात. यामुळे तुमच्या छातीत दुखायचे कमी होईल.

२) तेल, तूप, मांसाहार, बटाटा, अंडी, मुगाशिवाय कडधान्ये, मिठाई, कोल्ड्रिंक, कृत्रिम पेये. डालडा, साबुदाणा, गहू, बेकरीचे पदार्थ यांचे सेवन अजिबात करू नये. कारण यामुळे तुमच्या छातीतील वेदना अजनू वाढतील.

३) तारतम्याने पूर्ण विश्रांती किंवा माफक फिरणे हे व्यायाम करावेत. मात्र, चढावर फिरणे टाळावे.

४) तसेच छातीत दुखण्याचा बाऊ करू नये आणि उपेक्षाही करू नये. बुटक्या, पोट मोठे असलेल्या माणसाला आणि छातीत ठराविक जागी दुखत असल्यास सतत धोका असतो. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु