चिकन खाल्ले तर ‘हे’ व्हिटॅमिन भरपूर मिळते, याच्या कमतरतेने येऊ शकतो मृत्यू

चिकन खाल्ले तर ‘हे’ व्हिटॅमिन भरपूर मिळते, याच्या कमतरतेने येऊ शकतो मृत्यू

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : आपल्या शरीराला विविध पोषकतत्वांची आवश्यकता असते. यापैकी एकखादे पोषकद्रव्य शरीराला कमी प्रमाणात मिळाल्यास अथवा त्याची कमतरता निर्माण झाल्यास अनेक समस्या होतात. यापैकी बी १२ हे व्हिटॅमिन अत्यंत आवश्यक असते. परंतु, या व्हिटॅमिनची कमतरता असल्याचे लवकर लक्षात येत नाही. भारतात ८० टक्के पौढांमध्ये याची कमतरता आढळून येते. बी १२ च्या कमतरतेकडे दुर्लक्ष केल्यास मृत्यू सुद्धा ओढावू शकतो. चिकन खाणारांना हे व्हिटॅमिन मोठ्याप्रमाणात मिळते.

यासाठी आहे आवश्यक
१) विटॅमिन बी १२ शरीरातील चरबीचे ऊर्जेत रूपांतर करते.
२) डीएनए, लाल रक्त पेशी बनविते.
३) यामुळे नर्वस सिस्टम योग्यपद्धतीने काम करते.

हे आहेत धोके
याच्या कमतरतेने मेंदूला गंभीर इजा पोहचू शकते.
याच्या कमतरतेमुळे भविष्यात मृत्यु सुद्धा येऊ शकतो.

ही आहेत लक्षणे
१ लूज मोशनची समस्या उद्भवणे
२ सांधेदुखीची समस्या असणे
३ सतत बद्धकोष्ठतेची समस्या असणे
४ वेगाने वजन घटणे
५ स्मृती कमजोर होणे
६ डोकेदुखीची समस्या उद्भवणे
७ थकवा आणि अशक्त वाटणे
८ रक्ताची कमी असणे
९ ह्रदयाची ठोके वाढणे
१० श्वास फुलण्याची समस्या उद्भवणे

यामध्ये एवढे व्हिटॅमिन बी १२
* १०० ग्रॅम चिकनमध्ये १.११ मायक्रोग्रॅम
* १०० ग्रॅम मासे खाल्ले तर ०.६२ मायक्रोग्रॅम
* १ ग्लास दुधात ०.५५ मायक्रोग्रॅम
* १ वाटी दहीत ०.७५ मायक्रोग्रॅम
* १ अंड्यामध्ये ०.३९ मायक्रोग्रॅम

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु