सकाळी ‘या’ गोष्टी टाळल्या तर तुम्ही रहाल निरोगी, जाणून घ्या

सकाळी ‘या’ गोष्टी टाळल्या तर तुम्ही रहाल निरोगी, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम –  सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपण जे काही करतो त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. उत्तम आरोग्यासाठी सकाळी फिरायला जाणे, व्यायाम करणे, उपाशीपोटी कोमट पाणी पिणे, योगा करणे या चांगल्या सवयी आहेत. परंतु, अनेक जण यापैकी काहीच करत नाहीत, तर काहीजण काही चुकीच्या गोष्टी करतात, यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. सकाळी उठल्यावर कोणत्या गोष्टी टाळाव्यात याविषयी जाणून घेवूयात.

हे लक्षात ठेवा

१) सकाळी कुणाशीही वाद घालू नका. यामुळे मूड आणि दिवस दोन्ही खराब होतात.

२) सकाळी पौष्टिक आणि सात्त्विक आहार घ्या. मसालेदार, चमचमीत आहाराने पोटात जळजळ होते आणि पचन‍ क्रिया बिघडते.

३) सकाळी उठल्यावर सिगारेट पिण्याची सवय धोकादायक आहे. याने कर्करोग होऊ शकतो.

४) तंबाकु, मावा खाऊन वॉशरूमला जाणे आरोग्यास हानीकारक आहे. या गोष्टी नेहमीच टाळल्या पाहिजेत.

५) सकाळी अल्कोहलचे सेवन केल्याने अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. व्याधी जडतात.

६) झोप झाल्यावरही लोळत राहणे हे आरोग्यासाठी योग्य नाही. आळशीपणा वाढतो आणि स्फूर्ती मिळत नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु