‘सेक्स लाईफ’मध्ये ‘वायग्रा’चा वापर करत असाल तर ‘हे’ नक्‍की वाचा !

‘सेक्स लाईफ’मध्ये ‘वायग्रा’चा वापर करत असाल तर ‘हे’ नक्‍की वाचा !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम-  आजकाल डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय वायग्रा सर्रास घेतली जाते. याचा अर्थ असा नाही की वायग्रा आपल्या स्वास्थ्यासाठी हानिकारक नाही. तज्ञांच्या मते या गोळीचा फायदा त्या लोकांना होतो ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम आहे. हे पुरुषांच्या नपुंसकतेचे मोठे कारण आहे. त्यामुळे ज्यांना इरेक्शनचा प्रॉब्लेम नाही त्यांनी या गोळीचे सेवन टाळायला हवे.

image.png

इतर औषधांप्रमाणेच वायग्राच्या वापरानेही खतरनाक दुष्परिणाम होऊ शकतात. भारतासारख्या देशात जिथे सेक्सवर खुलून बोलले जात नाही तिथे वायग्राचा वापर लोक कोणताही विचार न करता करतात. खास करून तरुण दीर्घकाळापर्यंत आनंद घेण्यासाठी आणि आपला पार्टनर नाराज होऊ नये या भीतीने वायग्राचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच करतात. जर तुम्हीही या गोळीचा वापर कोणताही विचार न करताच करत असाल तर हे लक्षात असू द्या की, वायग्रा एक सुरक्षित औषध नाही.

image.png

वायग्राचे साईड इफेक्ट्स खूपच खतरनाक आहेत. ही गोळी इतकी खरतनाक आहे की, याच्या वापराने माणूस कायमस्वरुपी आंधळाही होऊ शकतो. लोकांना हे माहितीच नाहीये. अनेकदा याच्या वापराने इरेक्शन दीर्घकाळ रहाते जे स्वास्थ्यासाठी चांगलं नाही. याच्यामुळे असेही होऊ शकते की, आयुष्यभर तम्हाला इरेक्शनचा प्रॉब्लेम होऊ शकतो.

image.png

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु