कानदुखीवर घरगुती उपाय करताय मग ‘या’ गोष्टी नक्‍की टाळा, जाणून घ्या

कानदुखीवर घरगुती उपाय करताय मग ‘या’ गोष्टी नक्‍की टाळा, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कान हे आपल्या शरीराचे महत्वाचे अवयव आहेत. त्यामुळे आपल्याला कानाची विशेष काळजी घ्यावी लागते. सर्दी किंवा अन्य इंफेक्शनमुळे कधीकधी कानदुखीची समस्या निर्माण होते. कानदुखीवर तसे तर डॉक्टरांनाच दाखवायला पाहिजे. पण जर जास्त दुखत नसेल तर आपण काही घरगुती उपाय करू शकतो. जाणून घेऊया कानदुखीवर काही घरगुती उपाय :

१) तिळाच्या किंवा राईच्या तेलात लसणाच्या २-३ पाकळ्या ठेचून टाका. आणि हे उकळून घ्या. हे तेल थोडं कोमट झाल्यावर कापसाच्या बोळ्याने ते कानात टाका. असे केल्याने तुमचा कान काही वेळातच बरा होईल.

२) कानदुखीचा त्रास होऊ नये यासाठी थंड पदार्थ खाणे टाळा. कारण जास्त थंड पदार्थ खाल्यामुळे कानदुखीची समस्या निर्माण होऊ शकत नाही.

३) अंघोळ करत असताना कानात पाणी जाणार नाही. याची काळजी घ्या.

४) अनेकांना कानात वारंवार काडी घालायची सवय असते. यामुळे आपल्या कानाला इजा पोहचू शकते. त्यामुळे कानात काडी घालू नका.

५) अंघोळ झाल्यानंतर कान कोरड्या कापडाने नीट पुसून घ्या. आणि वारंवार कान खाजवणे टाळा. यामुळे कानाच्या समस्या निर्माण होणार नाहीत.

 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु