कागदामध्ये पार्सल घेताय ‘तर’ हे नक्की वाचा

कागदामध्ये पार्सल घेताय ‘तर’ हे नक्की वाचा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण अनेकदा भजी, वडापावचे पार्सल घेतो. अनेकठिकाणी दुकानदार हे पार्सल देताना आपल्याला कागदामध्ये बांधून देतो. आपल्या सोयीसाठी आपण ते घेतो. पण त्यामागचे नुकसान काय आहे. हे आपल्याला माहित नसत. त्यामुळे दुकानदाराने वृत्तपत्रात पार्सल दिले तरी आपण त्याला काहीच म्हणत नाही. पण असे केल्याने आपल्या आरोग्याला खूप मोठा धोका निर्माण होतो. हे जाणून घेणे गरजचे आहे.

१) कागदात बांधलेले खाद्यपदार्थ विषारी होतात. आणि हे पदार्थ आपण खाल्ले तर आपल्याला कर्करोगाचा धोका असतो. त्यामुळे वृत्तपत्रात बांधलेले खाद्य पदार्थ आरोग्यासाठी घातक असतात.

२) कागदाला असणाऱ्या शाईमुळे अन्नपदार्थ दूषित होतात. आणि दूषित पदार्थ आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतात.

३) तसेच यामध्ये असणारे जैविक घटकही आरोग्यास घातक असतात.

४) पार्सल ला वापरला जाणारा कागद हा चांगल्या कागदाचा पुनर्वापर करून बनवलेला असतो. तसेच यात विविध रसायने आढळतात. ती शरीरासाठी खूप घातक असतात. त्यामुळे खाद्य पदार्थ पार्सल घेण्यासाठी आपण जे वृत्तपत्राचे कागद वापरतो. ते आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतात.

५) आणि आपल्याला अनेकदा सवय असते. आपण वडापाव किंवा भजी खायला घेतली तर ती पेपरमध्ये घेतो. आणि त्याला जास्त तेल असल्यामुळे ते आपण पेपरमध्ये शोषून घेतो. पण असे केल्याने आपल्याला कर्करोग होण्याची दाट शक्यता असते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु