कफच्या समस्येने त्रस्त असाल तर ‘खा’ खडीसाखर, होतील ‘हे’ ५ फायदे !

कफच्या समस्येने त्रस्त असाल तर ‘खा’ खडीसाखर, होतील ‘हे’ ५ फायदे !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे अनेकांना सर्दी होते. सर्दीमुळे कफच्या समस्येचा सामना करावा लागतो. आपल्याला काय करावे ते समजत नाही. त्यासाठी कडीसाखर हे फार उपयुक्त ठरते. आणि आयुर्वेदात खडीसारखेला आरोग्यदायी महत्त्व आहे. खडीसाखरेमुळे कमकुवत रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास, ताण तणाव हलका करण्यास मदत होते. तसेच घशातील खवखव, खोकला दूर करण्यास मदत होते. कफमुळे येत असलेला खोकला कमी करण्यासाठी खडीसाखर मदत करते.

खडीसाखर खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे :

१) कफच्या त्रासावर घरगुती औषध बनवण्यासाठी काळीमीरी आणि खडीसाखर समप्रमाणात घेऊन एकत्र वाटावी. या सर्व मिश्रणाची बारीक पूड तयार करा.आणि चहामध्ये हे मिश्रण एकत्र करून दिवसातून २ वेळा पिणे फायदेशीर आहे. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच कफाचा त्रास नियंत्रणात राहतो.

२) खडीसाखरमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. आणि आपल्या शरीरासाठी कॅलरीज खूप आवश्यक आहेत. त्यामुळे शरीरातील कॅलरीज वाढवण्यासाठी खडीसाखर अत्यंत उपयुक्त आहे.

३) मधुमेहांच्या रुग्णांनी आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी खडीसाखरचे सेवन करणे गरजेचे आहे.

४) साखरेपेक्षा खडीसाखर नेहमी चांगली. सर्दीमुळे नाक वाहत असेल अथवा घशात खवखव जाणवत असेल तर खडीसाखरेचे पाणी प्यावे.

५) तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास खडीसाखर सहायक असते. खोकल्याची वारंवार ढास येत असेल, तर ती थांबविण्याकरिता कातीच्या लहानशा तुकड्याबरोबर थोडी खडीसाखर चघळावी.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु