” टाच ” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

” टाच ” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – आपल्या दैनंदिन जीवनात बहुतांश वेळा जाणवणारे पण अनेकदा दुर्लक्षित होणारे काही आजार आढळून येतात. सकाळी उठल्यापासून त्याचे पडसाद आपल्या नित्य-कर्मांवर आणि आरोग्यावर पडत असतात. यातील एक मुख्य आजार म्हणजे टाचदुखी. बराच वेळ एकाच जागेवर बसलो. आणि नंतर चालायला लागलो.कि, आपल्याला टाच दुखीमुळे चालता येत नाही. आणि वेदना होतात. परंतु याकडे दुर्लक्ष करू नका. कारण नंतर याचा जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळे जाणून घ्या. या आजारावरील कारणे आणि उपाय.

* टाच दुखीची कारणे खालीलप्रमाणे *

१) लठ्ठपणामुळे हा आजार विकसित होण्याची जास्त शक्यता आहे. शरीराच्या अचानक वाढलेल्या वजनामुळे टाचेवर अतिभार येऊन टाच दुखू लागते.

२) गर्भवती स्त्रीयांचे गर्भधारणे दरम्यान वजन वाढते. त्यामुळे गर्भधारणे दरम्यान सुद्धा अनेक स्त्रियांच्या टाचा दुखतात.

३) जास्त वेळ एकाच ठिकाणी उभे राहिल्याने, लांब अंतर चालण्यामुळे टाचांमध्ये या वेदना निर्माण होतात.

४) ४० ते ७० वयोगटातील व्यक्तींना हा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो.

* टाच दुखीचे उपाय खालीलप्रमाणे *

१) टाचेसाठी काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम असतात. ते नियमित पणे केल्यास टाचेला आराम मिळतो.

२) हाडांमध्ये व्हिटॅमिन आणि कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कॅल्शिअमयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.

३) जर अनेक उपाय करूनही टाच बरीच झाली नाही. तर इंजेक्शन घ्यावे लागते. त्यानेही नाही फरक पडला. तर शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव उपाय आहे.कारण टाचेत गाठ असण्याची शक्यता असते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु