तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – उद्या हरतालिका आहे. या दिवशी लग्न झालेल्या महिला छान श्रुंगार करतात आणि उपवास करतात. या दिवसाची महिला उत्सुकतेने वाट पाहतात. या दिवशी महिला एकत्र येऊन खेळ खेळतात आणि गाणी गातात. जर प्रेग्नेंट महिला हा उपवास करण्याचा विचार करत आहे तर त्यांना काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. त्यांनी पुर्ण दिवसाचे प्लॅनिंग करणे गरजेचे आहे.

प्रेग्नेंट महिलांनी या गोष्टींचे पालन करणे गरजेचे

१. प्रेग्नेंट महिलांनी चुकूनही उपवास करु नये. ती जे खाते त्याने बाळाला पोषण मिळत असते. त्यामुळे तिने उपाशी राहिल्याने बाळावर वाइट परिणाम होतात.

२. जास्तवेळ उपाशी राहू नका आणि मधे-मधे काहीतरी खात चला. जर तुम्ही उपवास केला असेल तर फळे खा आणि याव्यतिरिक्त ज्यूस प्या. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होणार नाही.

३. जास्तप्रमाणात कॉफी, चहा पिऊ नका. नाहीतर पोटात आग होऊ शकते.

४. शरीराला पुरेसे पोषकद्रव्ये मिळावे म्हणून मध्ये-मध्ये ड्राय फ्रुट्स खात रहा पण हे मर्यादित खा.

५. प्रेग्नेंट महिलांनी कोणतेही खेळ खेळू नये. लांब उभे राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्या.

६. जास्त गोड पदार्थ खाऊ नका. आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवा.

७. अनेक महिला निरंकार उपवास करतात. प्रेग्नेंट महिलांनी निरंकार उपवास करु नये.

८. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उपवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांना विचारल्याशिवाय उपवास करु नका.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु