भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या

 
भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या

आरोग्यनामा ऑनलाईन – चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार यामुळे अ‍ॅसिडिटी, गॅस अशा पोटाशी सबंधीत समस्या सातत्याने होत असतात. यामुळे भूक कमी होऊ लागते. कमी भूकेमुळे शरीराला पुरेसा आहार मिळत नाही. ज्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता वाढते. भूक लागत नसल्यास कोणते उपाय करावेत याची माहिती घेवूयात.

हे उपाय करा

हिरवे धने घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची, टोमॅटो, अद्रक, पुदिना, जिरे, हिंग, मीठ आणि काळे मीठ टाकून तयार केलेली चटणी खावी.

एक ग्लास ताकामध्ये काळे मीठ, बारीक जीरा पावडर टाकून हे ताक पिल्यास पचनक्रिया वाढते. अरुची दूर होते.

जेवण केल्यानंतर वज्रासनामध्ये थोडा वेळ बसा. यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते आणि गॅसची समस्या दूर होते.

जेवणाच्या एक तास अगोदर पंचसकार चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास चांगली भूक लागते.

रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घ्या. सकाळी पोट साफ होते आणि भूक वाढते.

जेवण झाल्यानंतर ओव्याचे चूर्ण थोड्या गुळासोबत कोमट पाण्यातून घ्या. जेवण सहजतेने पचते आणि योग्य वेळेला भूक लागते.

जेवण झाल्यानंतर एक चमचा हिंगाष्टक चूर्ण खावे. पचनक्रिया ठीक होते. भूक लागते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु