दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या

दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेकजण दिवसभर ऑफिसमध्ये किंवा कामानिमित्त बाहेर असतात. काहींना दुपारचं जेवण झालं की झोप येते. याचा परिणाम त्यांच्या कामावर होत असतो. त्यामुळे तुम्हाला दिवसा झोप येऊ नये म्हणून आम्ही काही उपाय सांगणार आहोत. ते उपाय केले तर तुम्हाला दिवसा झोप येणार नाही. त्यामुळे जाणून घ्या हे उपाय.
दिवसा झोप येऊ नये म्हणून उपाय खालील प्रमाणे :
१) पाणी :
तुम्ही जर दिवसभर खूप पाणी पित राहिलात तर तुमची दिवसभर झोप येणार नाही. आणि पाणी पिल्याने आपण फ्रेश होतो.त्यामुळे झोप जाते. त्यासाठी तुम्हाला जर दिवसा झोप आली तर तुम्ही पाणी प्या. तुमची झोप जाईल.
२) फळं आणि भाज्या:
तुम्ही तुमच्या आहारात ताजी फळं आणि भाज्यांचा समावेश करा. हा दिवसाची झोप घालवण्याचा उत्तम मार्ग आहे. फळं आणि भाज्यांमधून व्हिटॅमिनस आणि मिनरल्स मिळतात त्यामुळे तुमच्या शरीराचं कार्य सुरळीत चालतं. आणि तुम्हाला थकवा येत नाही. त्यामुळे तुमचे झोपेवर नियंत्रण राहते.
३) सूर्यप्रकाश :
दिवसभर काम करण्यासाठी तुम्हाला जर दिवसाची झोप टाळायची असेल तर पुरेसा सूर्यप्रकाश घेणं गरजेचं आहे. कारण दिवसभर ऑफिसमध्ये आपल्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे आपल्याला दिवसा झोप येते.
४) हालचाल :
आपण दिवसभर ऑफिसमध्ये असतो. तेव्हा आपली हालचाल होत नाही. त्यामुळे ऑफिकमध्ये असताना दर १ तासाला उठून थोडस फिरा म्हणजे तुम्हाला झोप येणार नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु