‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण थोडं जरी आजारी असलो तरी लगेच पेनकिलर खातो. त्यामुळे आपल्याला काही वेळात आराम तर मिळतो. पण मात्र हे त्यांच्या जीवावर बेतू शकते. आपल्याला हृदयरोगासारखा आजार आहे हे माहिती नसल्याने अनेकजण पेनकिलरला बळी पडतात. पेनकिलर घेतल्याने आपल्याला हृदय रोगाचा धोका होण्याची शक्यात असते.

१) अधिक प्रमाणात पेनकिलरचा वापर केल्यास किडनी फेल होण्याची शक्यता असते.

२) काही स्ट्राँग पेनकिलर्समुळे ब्लड प्रेशरही वाढू शकते किंवा कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढू शकतो.

३) ज्या व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्याने पेनकिलरचे सेवन करत असतील त्यांनी डॉक्टरांकडून या पेनकिलरच्या दुष्परिणामांची माहितीसुद्धा घेणे गरजेचे आहे.

४) काही जण थोडा त्रास होत असेल तर पेनकिलर घेतात. खूपच गरज असेल तर पॅरासिटामोलसारख्या हलक्या पेनकिलरचा वापर करा. परंतु ही सवय जडणे धोक्याचे आहे.

५) आपण डोकं दुखत असेल तर पेनकिलर खातो. कारण डोकेदुखी हा आपल्याला सामान्य आजार वाटतो. पण असं करू नका. डोकं दुखत असेल तर पेनकिलर घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु