‘ही’ सात लक्षणे आढळल्यास असू शकतो ‘किडनी स्टोन’, वेळीच करा उपचार

‘ही’ सात लक्षणे आढळल्यास असू शकतो ‘किडनी स्टोन’, वेळीच करा उपचार

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही आजारांचे उशीरा निदान झाल्यास अथवा लक्षणे आढळूनही ती न ओळखता आल्यास हे आजार गंभीर रूप धारण करू शकतात. असाच एक गंभीर आजार म्हणजे किडनी स्टोन होय. हा आजार खुप त्रासदायक असून याची लक्षणे वेळीच ओळखून उपचार करणे गरजेचे असते.

ही आहेत लक्षणे

१) पोटाच्या खालील भागात वेदना
पोटाच्या खालच्या भागाला, मांड्यांमध्ये आणि पायामध्ये वेदना होत असल्यास किडनी स्टोन असू शकतो. अशावेळी ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.

२) त्रास कमी-जास्त होणे
पोटाच्या बाजूला कमी-जास्त प्रमाणात वेदना होत असतील, थोड्या थोड्या वेळाने हा त्रास होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.

३) लघवीतून रक्त
लघवीतून जर रक्त येत असेल तर हे किडनी स्टोनचे लक्षण असू शकते .

४) लघवीचा वास
किडनी स्टोन या आजारांत लघवीचा घाण वास येतो. हे लक्षण आढल्यास वेळीच लक्ष द्या.

५) उलट्या होणे
वारंवार उलट्या होणे, मळमळ होणे ही सुद्धा किडनी स्टोनची लक्षणे असू शकतात.

६) वारंवार लघवी
वारंवार लघवीला जावे लागत असेल, लघवीवर नियंत्रण ठेवण्यास त्रास होत असल्यास किडनी स्टोन असू शकतो.

७) लघवी करताना त्रास
किडनी स्टोन असल्यास लघवी करताना वेदना होतात. हा त्रास जास्त काळ सहन केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु