‘या’ कारणांमुळं मासिक पाळी तारखेच्या आधी येते, काळजी घ्या

‘या’ कारणांमुळं मासिक पाळी तारखेच्या आधी येते, काळजी घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मासिक पाळी ही काही लोकांना तारखेच्या खूप दिवसा आधी येते. याचे कारण काय असू शकतात. ते आज आपण जाणून घेणार आहोत. अनियमित मासिक पाळी हे अनेक रोगांचे निमंत्रण असते. अशातच जर का मासिक पाळी तारखेच्या आधी आली तर शारीरिक अशक्त पणा ही जाणवतो.

तणाव 
कित्येकदा महिलांना तणाव आणि चिंताने शरीरातील स्ट्रेस हार्मोन वर परिणाम होतो. ज्यामुळे शरीरात एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन वर परिणाम होतो. शरीरातील रक्तात स्ट्रेस हार्मोन वाढल्याने ज्याचा परिणाम मासिक पाळीवर होतो.

image.png

कॉफीचा अधिक सेवन 
कॉफीच्या अधिक सेवनानेही मासिक पाळीवर प्रभाव पडतो. कॉफी, चहा आणि चॉकलेटच्या जास्त सेवनाने महिलांच्या शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होतो.

image.png

अल्कोहोलचा अधिक सेवन 
अल्कोहोलचा सेवन अधिक केल्यानेही हार्मोन्स मध्ये अधिक बदल होतो. यामुळे हार्मोन्सची संतुलन बिघडते आणि मासिक पाळी तारखेच्या आधी येते.

image.png

अधिक व्यायाम 
काही महिलांना शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करण्याची सवय असते. अशा या व्यायामामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते. आणि मासिक पाळीच्या दरम्यान शरीरात ऊर्जाच शिल्लक राहत नाही. अचानक वजन वाढल्याने किंवा कमी झाल्यानेही मासिक पाळीवर परिणाम होतो.

image.png

औषधे 
जर मासिक पाळीच्या आधी तुम्ही आजारी असल्याने औषधे घेत असल्यानेही शरीरातील हार्मोन्सवर परिणाम मोठ्या प्रमाणात होतो. अशा या परिणामामुळे मासिक पाळी वेळेच्या आधीच येते.

image.png

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु