गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय

गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आता असं कोणतंच घर नाही की त्या घरात गॅस नाही.  जवजवळ सगळीकडे गॅसचा सर्रास वापर केला जातो. गॅस हा आपल्या सोयीसाठी खूप चांगले साधन आहे. पण ते हाताळताना योग्य ती काळजी घ्यावी लागते. कारण गॅस लीक झाल्यामुळे काय नुकसान होते. हे आपल्याला माहीतच असेल. त्यामुळे गॅस लीक झाल्यावर आपल्याला आपली सुरक्षा करता यायला हवी. यासाठी खालील उपाय करा.

१) तुमच्या घरातील किंवा अन्य कुठल्या ठिकाणचा गॅस लीक होत असल्याचे आढळल्यास गॅस त्वरित बंद करा. घरात अगरबत्ती, मेणबत्ती अशा प्रज्वलित गोष्टी त्वरीत विझवा. यामुळे गॅसचा स्फोट होणार नाही. आणि तुमचे रक्षण होईल.

२) गॅस लीक होत आहे. असं समजलं की लगेच गॅसचा रेग्युलेटर बंद करा. आणि घरात दिवा लावू नका.

३) घरातील ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे स्विचेस चालू असतील तर ते लगेच बंद करा.

४) दरवाजे खिडक्या उघड्या करा म्हणजे गॅस घरात कोंडून रहाणार नाही.

५) गॅस जर असा कायम ली होत असेल तर गॅसच्या सप्लायरला गॅस दाखवून घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु