शरीराला खाज येत असल्यास करु नका दुर्लक्ष,असू शकतात ‘हे’ गंभीर आजार

शरीराला खाज येत असल्यास करु नका दुर्लक्ष,असू शकतात ‘हे’ गंभीर आजार

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीराला खाज सुटत असल्यास बहुतांश लोक त्वचेचे इन्फेक्शन असल्याचे समजून दुर्लक्ष करतात. परंतु, असे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. अशाप्रकारे शरीराला खाज येणे हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. शरीराला खाज येत असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या. या लक्षणांची अधिक माहिती आपण घेणार आहोत.

ही आहेत कारणे

१) किडनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर निघू शकत नाहीत. यामुळे शरीरात खाज सुटते.

२) रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास रक्तप्रवाहात अडथळा येतो. यामुळे खाज सुटते.

३) शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास शरीरात खाज निर्माण होते.

४) औषधे किंवा खाण्या-पिण्याच्या पदार्थांच्या अ‍ॅलर्जीमुळे सुद्धा खाज सुटू शकते.

५) घाम किंवा फंगल इन्फेक्शनमुळे शरीरात खाज निर्माण होते.

६) हॉर्मोनल बदलांमुळे त्वचा कोरडी होऊन शरीर खाजवते.

७) शरीरात कॅन्सरसदृश्य गाठी असल्यास त्यातून निघणाऱ्या पदार्थांच्या रिअ‍ॅक्शनमुळे शरीराला खाज सुटू शकते.

८) लिव्हर खराब झाल्यास संपूर्ण शरीरातील डिटॉक्झिफिकेशन प्रक्रियेवर परिणाम होऊन शरीराला खाज येते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु