गर्भवती महिलांना हे संकेत मिळाले तर त्यांची प्रसूती कधीही होऊ शकते.

गर्भवती महिलांना हे संकेत मिळाले तर त्यांची प्रसूती कधीही होऊ शकते.

पुणे: आरोग्यनामा ऑनलाईन : गर्भवती महिलांना प्रत्येक महिन्यात नवीन शारीरिक बदल जाणवतात. हे नऊ महिने गर्भवती स्रियांना खूप वेगवेगळे अनुभव देऊन जातात. आणि या नऊ त्यांना त्रासही सहन करावा लागतो. पण कितीही त्रास झाला तरी त्यांना त्यांचं बाळ या जगात कधी येत असं वाटत असत. गर्भवती महिलांची प्रसूती म्हणजे त्या स्त्रीचा नवीनच जन्म असतो. गर्भवती स्रियांना प्रसूतीच्या काही दिवस अगोदर वेगवेगळे संकेत मिळत असतात. असे काही संकेत आहेत. कि, ते गर्भवती महिलांना सांगतात. कि तुमची आता कधीही प्रसूती होऊ शकते.

* गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्वी मिळणारे संकेत *

१) गर्भवती महिलांची पोटावर दबाव आला. आणि पाठ दुखायला लागली. तर त्यांनी समजावे कि आता त्यांची कधी ही प्रसूती होऊ शकते.

२) ज्या गर्भवती महिलांना सारखी सारखी लघवी आली. किंवा जास्त वेळा लघवीला जावं लागलं. तर त्या महिलांची प्रसूतीची वेळ जवळ आलेली असते.

३) जर गर्भवती महिलांना असं वाटलं कि,आता बाळ खूप खाली आलं आहे. किंवा चालताना असं जाणवलं कि आता बाळ कधीही खाली पडू शकत. तर त्यांनी समजावे की, आता त्यांची प्रसूती कधीपण होऊ शकते.

४) ज्या गर्भवती महिलांचा पोटाचा शेप बदलला आहे. असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी समजावे कि,आता त्यांची प्रसूती होऊ शकते. हे असे संकेत गर्भवती स्रियांना मिळाले. तर त्यांनी सावधान राहावे. कारण असे संकेत मिळाल्यावर कधीही प्रसूती होऊ शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु