शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट

शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपले व्यक्तीमत्व सर्वांमध्ये उठून दिसावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु, शरीरयष्टी खुपच किरकोळ असल्याने व्यक्तीमत्व उठून दिसत नाही. यासाठी तब्येत सुधारण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात, परंतु, अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. वजन वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय केल्यास यात चांगला परिणाम दिसून येऊ शकतो.

हे ६ पदार्थ खा

१) दालचिनी
एक ग्लास दुधात एक चमच दालचिनी पावडर, मध मिसळून ते प्या. यामुळे वजन वेगाने वाढते.

२) मध, हळद
एक चमचा मधात एक चमचा हळद पावडर मिसळा. हे मिश्रण रोज सेवन करा. यामुळे दुबळेपणा दूर होतो.

३) केळी
रोज सकाळ-संध्याकाळ दोन-तीन केळीसोबत एक ग्लास दूध प्या. नियमित केळी खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या दूर होतात. वजनही वेगाने वाढते.

४) सुकामेवा
एक ग्लास दुधात बदाम आणि काजू मिसळून रात्री झोपण्याअगोदर प्या.

५) चनाडाळ
रोज रात्री ८ ते ९ चमचे चनाडाळ पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी या डाळीत बेदाणे आणि मिश्री मिसळून सेवन करा. यामुळे दुबळेपणा दूर होतो.

६) मनुके
सात ते आठ मनुके गरम पाण्याने धुवून रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी सेवन करा. यामुळे दुबळेपणा कमी होतो.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु