लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत

लहान बाळाला सर्दी झाली तर करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या पद्धत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम –  लहान बाळाचे आजारपण हे सर्वात जोखमीचे असते. त्यांच्या छोट्या आजारांकडे दुर्लक्ष केल्यास बाळासाठी ते त्रासदायक ठरू शकते. यासाठी पावसाळ्यात सर्दी-खोकल्यासारखा आजार बाळाला झाल्यास वेळीच उपचार करावेत. घरच्याघरी काही साधे उपाय केल्यास लहान बाळांना चांगला लाभ होतो.

करा हे उपाय

१) बाळाच्या तळपायाला हलकसं व्हिक्स चोळा. नंतर त्यास सॉक्स घाला. लवकर सर्दी बरी होते.

२) तव्यावर चार मध्यम आकाराच्या लसणाच्या पाकळ्या आणि थोडा ओवा भाजून गरम असतानाच हे सर्व रुमालात बांधा. ही पुरचुंडी थंड झाल्यावर बाळाच्या उशाशी ठेवा. या वासाने बाळाची सर्दी दूर होईल.

३) दोन-तीन थेंब आल्याचा रस चमचाभर मधात छान टाकून थोड्या कोमट पाण्यातून हे मिश्रण बाळाला हळूहळू पाजा. एक वर्षाहून मोठ्या बाळासाठी हा उपाय आहे.

४) गरम पाण्यात व्हिक्स टाकून बाथरूम बंद करा. बाथरूममध्ये व्हिक्सचा वास दरवळेल. मग बाळाला घेऊन तिथे बसा. यामुळे बाळाला व्हिक्सची सौम्य वाफ मिळेल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु