अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत

अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. रक्तामधील साखर शरीरकोषांना आवश्यक असते. परंतु, खाण्याच्या विपरित सवयींमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होते. यामुळे शरीरात विकृती निर्माण होते. साखरेचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने शरीरकोषांना उर्जा कमी जास्त मिळत राहते. यामुळे त्रास होतो. हा त्रास वेळीच लक्षात आल्यास पुढील विकृती टाळता येते.

द्या या प्रश्नांची उत्तरे
*
अंगात उर्जा नसल्याने व्यायाम करणे टाळता का ?
* मन एकाग्र करताना त्रास होतो का ?
* वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो का ?
* वेळेवर जेवण न मिळाल्यास चीडचीड होते का ?
* सहा तास अन्न न मिळाल्यास गळून गेल्यासारखे वाटते का ?
* सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही का ?
* झोपेतून उठल्यावर आळस वाढतो का ? पुन्हा झोपावेसे वाटते का ?
* सकाळी चहा-कॉफी प्यायल्याशिवाय उत्साह वाटत नाही का ?
* सतत आळसावल्यासारखे वाटते का ? वि शेषत: जेवल्यानंतर ?

निष्कर्ष
१.
यापैकी निम्म्यापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे होय असतील तर रक्तातील साखरेची पातळी सम प्रमाणात राहत नाही, असे समजावे.
२. रक्तशर्करा असात्म्यता विकृतीचा त्रास असू शकतो.
३. मात्र आळसामुळे सुद्धा ही लक्षणे दिसू शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु