अंगावर वीज पडून दरवर्षी होतात शेकडो मृत्यू ! अशी घ्या काळजी

अंगावर वीज पडून दरवर्षी होतात शेकडो मृत्यू ! अशी घ्या काळजी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळा सुरू होताना आणि शेवटी वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. दरवर्षी यामुळे शेकडो लोक मृत्युमुखी पडतात. हे नैसर्गिक संकट असले तरी काही विशेष खबरदारी घेतल्यास हे संकट टाळता येऊ शकते. वीजांचा कडकडाट होत असताना कोणती खबरदारी घ्यावी, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

अशी घ्या खबरदारी

१) विजेपासून वाचण्यासाठी अनेकजण झाडांचा आश्रय घेतात. परंतु, उंच झाड विजेला आकर्षित करते. त्यामुळे झाडाखाली आश्रय घेऊ नका. सर्वात जास्त धोका झाडाखाली थांबल्यामुळे उद्भवतो. निर्जन ठिकाणी विखुरलेले झाडांचे समुह विजेला आकर्षित करतात.

२) कोसळणारी वीज ही उंच वस्तूवर, ठिकाणावर कोसळते आणि धातूच्या वस्तूवर जास्त आकर्षित होते.

३) तात्काळ मोकळया जागेवर यावे आणि दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन त्यांना दोन्ही हातानी आवळुन ठेवा. हनवटी जवळ घेतलेल्या गुडघ्यांवर टेकवा.

४) धातुंच्या वस्तू म्हणजेच छत्री, चाकु, लोखंडी अवजार, भांडे सोबत ठेवू नका. अशा वस्तू शरीराच्या वरच्या बाजुला असल्यास विजा चमकताना त्या दूर ठेवा.

५) विजा चमकत असताना मोबाइल, इंटरनेट जोडणी असलेले संगणक, टिव्ही, दुरध्वनी यांचा वापर करु नका. वीज यामुळे आकर्षित होवू शकते.

६) विजा चमकत असताना विद्युत प्लगमध्ये हेअड्रायर, विद्युत रेझर आदी वस्तू वापरू नका. कारण घरावर वीज कोसळली तर त्यातील प्रभार प्लगच्या माध्यमातून विद्युत प्लगमध्ये येवू शकतो. यामुळे घरासह जिवीतासही धोका होऊ शकतो.

७) चारचाकी वाहनात असल्यास वाहनातून बाहेर येऊ नये. कारण चारचाकी वाहन हे विजेपासून सुरक्षित ठेवणारे साधन आहे.

८) वीजा चमकत असताना पाण्यात अजिबात थांबू नये. पाण्यात असल्यास त्वरीत बाहेर या.

९) विजा चमकत असतांना विद्युत प्रभार जाणविल्यास अंगावरील केस उभे राहतात किंवा त्वचेला मुंग्या, झिणझिण्या येतात. असे जाणवल्यास वीज आपल्यावर पडणार, असे समजावे. यावेळी त्वरीत जमिनीवर बसलेल्या मुद्रेत जावे. अथवा जवळपास इमारत असल्यास त्वरित इमारतीचा आश्रय घ्या.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु