‘डिमेन्शिया’ रुग्णांची काळजी कशी घ्यावी

‘डिमेन्शिया’ रुग्णांची काळजी कशी घ्यावी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वया प्रमाणे आपण काही गोष्टी विसरायला लागतो. वय झाल्यावर थोडेफार विस्मरण हे स्वाभाविक आहे. या आजाराला डिमेन्शिया असेही म्हणता येते. या  आजाराचा  त्रास साठ किंवा त्याच्यापेक्षा जास्त वयानंतर सुरु होतो. तर या आजाराबद्दल खुप सारे गैरसमज लोकांच्या मनात असतात, लोकांना असे वाटते की या आजाराला काहीच उपचार नाहीत,

आता हा आजार वाढत जाणार, आता फक्त जमेल तशी सेवा करणं आपल्या हातात आहे. पण हा आजार वाढत जाणारा असला तरी त्याची लक्षण वाढणार नाही  आणि त्याचा त्रास कमी ही करता येतो. या आजारावर औषध नक्की उपलब्ध होतात ज्यामुळे रुग्याला व त्याची काळजी घेणाऱ्यांसाठी होणार त्रास कमी होऊ शकतो.

या आजारात घ्यायची काळजी :-

-अशा रुग्णांना शक्यतो स्वतः ची कामे स्वतः हाला करू द्या

– त्यांच्यावर कधीच रागावू नका त्यांच्या कडून काही चुकले असेल तर शांतपणे लक्षात आणून द्या.

– त्यांना जे काम करायचे आहे ते करू द्या

– शक्यतो त्यांच्या रूम मध्ये घड्याळ आणि कॅलेंडर दिसेल असे लावा.

– त्यांना घरातील लहान लहान कामे करू द्या

– अशा लोकांसाठी घरात मोठ्या अक्षराचे नंबर लिहून ठेवा.

– त्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.

– अशा रुग्णांना त्यांच्या आवडीचे कार्यक्रम, संगीत ऐकू द्या. त्यांना जास्तीत जास्त वेळ निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जावा

– त्यांना जमेल तास व्यायाम त्यांच्या कडून करून घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु