‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मध आणि आवळा दोन्हीही नैसर्गिक रित्या आरोग्य आणि सौंदर्यागुणांनी परिपूर्ण असे पदार्थ आहेत. आयुर्वेदापासून तर आजीबाईच्या बटव्यातही या दोन पदार्थांबद्दल उल्लेख तुम्हाला दिसेल. मध आणि आवळा यांना एकत्रित करून जे मिश्रण तयार केलं जातं त्याचं रोज सेवन केल्याने यामुळे मिळणारे फायदे डबल होतात.

1) रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ- आवळा एखाद्या योद्ध्याप्रमाणे शरीरातील रोगांशी लढण्याचं काम करतो. तर मध एखादी भिंत बनून प्रत्येक रोग येण्यापासून त्याला अडवण्याचं काम करतं. या दोन्हींच्या मिश्रणाने तुम्ही नेहमीच निरोगी रहाल. हे मिश्रण पचनसंस्थेलाही मजबूत करण्याचं काम करतं. मधात भिजवलेला आवळा अपचन आणि अॅसिडीटीवर सर्वात उत्तम उपाय आहे.

2) पित्त आणि मूळव्याधालाआराम- आवळा आणि मध हे मिश्रण तुमची भूक तर वाढवेलच सोबत तुमचे अन्न पचन होण्यासही मदत करेल. मधात भिजवलेला आवळा आणि त्याच्या मिश्रणाचे सेवन केल्याने पित्त आणि मूळव्याधासाठीही आराम मिळतो.

3) स्पर्म काऊंटमध्ये वाढ- आवळा आणि मधाच्या सेवनाने पुरुषांना खूप महत्त्वाचा फायदा मिळतो तो म्हणते त्यांच्या स्पर्म काऊंटमध्ये वाढ होते. आवळा आणि मधाचे मिश्रण मधुमेह आणि मूत्राशयात असणाऱ्या अडचणींनाही ठिक करतं.

4) ब्लड शुगर कंट्रोल- मध नैसर्गिक साखरेचं काम करतं त्यामुळे आवळा आणि मधाने ब्लड शुगरही कंट्रोलमध्ये रहाते. रक्ताशी संबंधित आजारावरही याचा मोठा फायदा मिळतो.

4) बॉडी डिटॉक्स करतं- डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी आवळा आणि मधाचे मिश्रण सर्वात उत्तम उपाय आहे. यामुळे वजनही वाढतं आणि आरोग्याशी निगडीत इतर धोके कमी होतात. रोज सकाळी काढा पिल्याने किंवा मधात भिजवलेला आवळा खाल्ल्याने आतड्यांमधील आणि रक्तातील विषारी पदार्थ दूर होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु