रक्तदाब कमी करतील ‘हे’ घरगुती मसाले, अवश्य वाचा

रक्तदाब कमी करतील ‘हे’ घरगुती मसाले, अवश्य वाचा

आरोग्यनामा ऑनलाइन – बदललेल्या जीवनशैलीमुळे रक्तदाबासारखे आजार वाढत चालले आहेत. चूकीचा आहार, खाण्या-पिण्याच्या चूकीच्या सवयीमुळे रक्तदाबाचा आजार बळावतो. परंतु, ही व्याधी कमी करण्यासाठी काही सोपे उपाय असून ते केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. रक्तदाब कमी करण्याचे सोपे घरगुती उपाय जाणून घेवूयात.

मेथी
उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी अर्धा चमचा मेथीचे दाणे रात्रभर गरम पाण्यात भिजवा. सकाळी उठून हे पाणी प्या. तसेच मेथीचे दाणे चाऊन खा. यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो.

लसूण
रक्त घट्ट झाल्यानंतर त्याचा वेग कमी होतो. नसा आणि धमण्यांवर दबाव पडतो. लसणात सेलेनियम, व्हिटॅमिन सी आणि एलिसीनसारखे अँटिऑक्सिडेंट असते. हे रक्त पातळ करते.

आले
बॅड कोलेस्ट्रॉल धमण्यांच्या काठावर जमा होते. यामुळे रक्ताचा प्रवाह थांबतो आणि उच्च रक्तदाबाची समस्या वाढते. अद्रकाने रक्तदाबात सुधारणा होते.

लाल मिरची
धमण्या कडक झाल्यानंतर रक्तवाहिन्या आणि नसा पातळ होतात. याने रक्ताच्या प्रवाहात व्यत्यय येतो, परंतु लाल मिरचीच्या मर्यादेत खाण्याने नसा आणि रक्तवाहिन्या रुंद होतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु