घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – घरी तयार केलेले लोणी योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्याचे अनेक फायदे होतात. कोलेस्टेरॉलच्या भीतीने अनेकजण घरातील लोणी खात नाहीत. परंतु योग्य प्रमाणात लोणी खाणे चव आणि आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. ताकापासून लोणी तयार करून खाण्याची पद्धत हजारो वर्षांपासून प्रचलित आहे. अलीकडे घरात लोण्याचा वापर कमी झाला आहे.

पाश्चराइज्ड पद्धतीने तयार केलेल्या लोण्यापेक्षा घरात बनलेले पांढरे लोणी अल्प प्रमाणात घेणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते, असे तज्ज्ञ सांगतात. घरात तयार केलेल्या लोण्याला कच्चे लोणी देखील म्हटले जाते. हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. पाश्चराइज केल्याने लोण्यातील अनेक पोषक तत्त्वे नष्ट होतात. ताजे लोणी गर्भवती महिलांसाठी उपयुक्त असते. लोणी बाळाच्या मेंदू, हाडे आणि दातांसाठी लाभदायक आहे. घरात तयार केलेले लोणी दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त काळानंतर वापरू नये.

घरचे लोणी ताजे राहण्यासाठी ऑक्सीजनविरहित हवाबंद ठिकाणी ठेवावे. तसेच लोणी तयार केल्यानंतरचे ताक देखील आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. यात मसाला टाकून घेतल्यास किंवा कढी केल्यास रुचकर लागते. लोणी जास्त असल्यास त्याचे तुपात रूपांतर करून साठवून ठेवा.

लोण्यात कोलेस्टरॉल आणि फॅटचे प्रमाण जास्त असल्याने हृदयासंबंधित आजार होतात. यामुळे विदेशात लोण्याचा वापर कमी आहे. भारतातही असेच दिसून येते. हृदयविकाराच्या भीतीने अनेकांनी लोणी खाणे पूर्णपणे बंद केले. परंतु, पांढरे लोणी आरोग्यासाठी उत्तम असते. यामध्ये मुबलक प्रमाणात शरीरात सहज मिसळले जाईल अशा स्वरूपात व्हिटॅमिन ए असते. जे थॉयराइडसाठी चांगले असते. यातील लेसिथिनमुळे चयापचय प्रणाली सक्षम होते. व्हिटॅमिन्स ए शिवाय पांढरे लोणी व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत आहे. यातील अँटीऑक्सीडेंट्स आर्टरीजचे रक्षण करतात. दातांच्या मजबुतीसाठी हे लाभदायक आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु