‘शुगर फ्री ब्लॅक कॉफी’ पिण्याचे ‘हे’ आहेत १० चमत्कारी फायदे, जाणून घ्या

‘शुगर फ्री ब्लॅक कॉफी’ पिण्याचे ‘हे’ आहेत १० चमत्कारी फायदे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोणत्याही पदार्थाचा अथवा पेयाचा अतिरेक हा वाईटच असतो. पण, अशा गोष्टी योग्यप्रमाणात सेवन केल्यास त्याचे आरोग्यावर चांगले परिणाम होऊ शकतात. चहा, कॉफी आरोग्यासाठी घातक असल्याचे आहारतज्ज्ञ सांगातत, पण हीच पेये योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्यापासून फायदे होतात.

अशाच प्रकारे शुगर फ्री ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते. यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. तसेच कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखी पोषकतत्त्व असतात.

हे आहेत फायदे

मेंदू
ब्लॅक कॉफी मेंदूला सतर्क करते आणि स्मरणशक्ती वाढवते. मानसिक आजारांपासून बचाव होतो.

उर्जा
कॉफीमधील कॅफीन सायकोएक्टिव असते जे बॉडीला रिलॅक्स करुन मूड चांगला करते. यामुळे ऊर्जा मिळते.

पचनक्रिया
विनासाखरेची ब्लॅक कॉफी प्यायल्याने टॉक्सिन्स आणि बॅक्टेरिया बाहेर निघतात आणि पोट साफ होते.

वजन
विनासाखरेची ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन लवकर कमी होते. मेटाबॉलिज्म ५० टक्के वाढते. पोट वाढत नाही.

हृदयरोग
शरीरातील सूजचे प्रमाण कमी होतो. यामुळे हृदयरोग कमी होतात.

अँटीऑक्सीडेंट
ब्लॅक कॉफीमध्ये भरपूर अँटीऑक्सीडेंट्स असतात. एक कप कॉफी प्यायल्याने व्हिटॅमिन बी २, बी ३ आणि बी ५, मॅगनीज, मॅग्नेशियम आणि पॉटॅशियम मिळते.

मधुमेह
टाइप २ डायबिटीजची भीती कमी होते. यामुळे डायबिटीज नियंत्रणात येतो.

कँसर
कॉफीमध्ये अँटीकँसर गुण असतात. ज्यामुळे कोलोरेक्टल कँसर होण्याची भीती कमी होते. लिव्हर कँसरची शक्यता ४० टक्के कमी होते.

तारूण्य
मेंदू आणि शरीर नेहमी तरुण राहते. यातील कॅफीनमुळे डोपामाइनचा स्तर वाढतो. पार्किंसंस सारखा आजार दूर होतो.

मूड
एक कप कॉफीमुळे मूड चांगला राहतो. त्यामुळे डिप्रेशनशी लढणे शक्य होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु