‘हसा व निरोगी राहा’ मधून मिळाले आरोग्याचे धडे

‘हसा व निरोगी राहा’ मधून मिळाले आरोग्याचे धडे

पुणे : आरोग्यनामा ऑनलाइन – आनंद हास्य योग क्लबच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकरोड येथील अपोलो हॉस्पिटलतर्फे ‘काळजी मानसिक व शारीरिक आरोग्याची – हसा व निरोगी राहा’ कार्यक्रमाचे आयोजन ऋतुरंग भवन येथे करण्यात आले होते. यातून उपस्थितांना आरोग्याचे धडे देण्याबरोबरच आरोग्याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

यावेळी अपोलो हॉस्पिटल्सचे मेंदू व मणके शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. संजय वेखंडे, किडनी विकार तज्ज्ञ डॉ. प्रकाश उगले, अस्थिरोग व गुडघे शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अनिल जाधव, मूत्रविकार व शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. प्रवीण गोवर्धने या तज्ज्ञांची मुलाखत हास्य क्लबचे अध्यक्ष ॲड. वसंत पेखळे यांनी घेतली. हास्य योग क्लबच्या सदस्या वैशाली सहस्रबुद्धे, आशा बोराडे, विद्या माळवे, सुरेखा दुसाने, नंदा शेळके, निशा काथवटे, विजया करवा, अंजली गणोरे यांनी ‘किटी पार्टी’ ही विनोदी नाटिका सादर केली. आदिती वाघमारे, डॉ. सुषमा दुग्गड, सुमन वाघ, आर. डी. बाफणा, आदिती आघारकर यांनी हास्ययोग सादर केले. या वर्षीचे हास्य श्रीमान म्हणून रामकृष्ण राव व हास्य श्रीमती म्हणून आशा बोराडे यांना गौरविण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अपोलो हॉस्पिटलचे विपणनप्रमुख डॉ. मंगेश जाधव, कैवल्य सोहनी, प्रदीप पवार, संदीप सांगळे आणि आनंद हास्य योग क्लबचे सुरेश सोनावणे, अनिल वंजारी, रमेश नवले, श्याम बोरकर, जयमाला भुतडा, लता गवळी आदींनी परिश्रम घेतले. कल्पना नवले यांनी आभार घेतले.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु