त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :- एका २६ वर्षीय मुलाने वजन कमी केल्याची ही गोष्ट अनेकांना प्रेरणादायी ठरू शकते. या मुलाचे वजन तब्बल १२४ किलो होते. ४ महिन्यात त्याने ३० किलो वजन कमी केले. या मुलाने सकारात्मक विचार आणि संपूर्ण डेडिकेशनने आपले लक्ष्य गाठले. वजन कमी करण्याचा प्रवास त्याला सर्वात अविस्मरणीय प्रवास वाटतो.

या मुलाने कोणता आहार घेतला ते आपण आधी पाहुयात. त्याने ब्रेकफास्टमध्ये ५ अंड्यांची भुर्जी, १० एमएल कोकोनट ऑइल, सीताफळ आणि व्ही प्रोटीन शेक घेतले. लंचमध्ये बॉइल्ड फिश, चिकन आणि १० एमएल ऑलिव्ह ऑइल, तूप आणि १०० ग्रॅम दही खाल्ले. संध्याकाळी स्नॅक्समध्ये पीनट, काकडी आणि गाजर, बदाम घेतले. डिनरमध्ये चिकन, पनीर, फिश, दोन काकड्या, दोन गाजर आणि पालक असा आहार घेतला. कधी-कधी पेस्ट्री, आईस्क्रीम, पिझ्झा खात होता. परंतु या गोष्टी आठवड्यातून एकदाच खाल्ल्या.

तसेच त्याने नियमित व्यायामही केला. तो दररोज दोन तास व्यायाम करत होता. दीडतास वेळ ट्रेनिंगला देत होता. ३० मिनिट कार्डिओ आणि १५ मिनिट एचआयआयटी व्यायाम करत होता. त्याने फिश, अंड्याची भुर्जी आणि दही खाणे कधीही सोडले नाही. तो आरशासमोर उभे राहून स्वतःला मोटिव्हेट करत होता. तो वर्कआऊट आणि डायट चेंज करत राहिला. यामुळे तो रुटीनने बोर झाला नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु